Walmik Karad,Sudarshan Ghule यांना जेलमध्ये मारहाण? Baban Gitte, Athavale Gang सोबतचा जुना वाद कारण?
#BolBhidu #Beed #WalmikKarad
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण, अशी बातमी सोमवारी दुपारपासून माध्यमांमध्ये यायला सुरूवात झाली. भाजप आमदार सुरेश धस यांनी तर पत्रकार परिषद घेऊन जेलमध्ये कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा दावा केला. वाल्मिक कराडची सगळ्या बीड जिल्ह्यात असलेली दहशत हा मागच्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना केलेली अमानुष मारहाण सुद्धा सगळ्या महाराष्ट्रानं पहिली आहे. पण या दोघांनाही तुरुंगातच मारहाण झाल्याची बातमी आल्यानं खळबळ उडाली. हि मारहाण महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी केल्याची चर्चा झाली.
त्यानंतर काही वेळात शशिकांत गीते या नावानं असलेल्या बबन गीतेच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली, ज्यामध्ये लिहिलं होतं, 'अंदर सबकुछ माफ है.' त्यामुळं या सगळ्या प्रकारानंतर बीडच्या जेलमध्ये गॅंगवॉर सुरु झालंय का ? याची चर्चा होताना दिसत आहे. पण जेलमध्ये नेमकं काय घडलं ? याबद्दल काय दावे केले जात आहेत ? महादेव गिते आणि अक्षय आठवले यांचा वाल्मिक कराडसोबत नेमका काय वाद आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/