भवन नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते
भल्या भल्या पोहणार्यांना उलथूनी पाडी ते
उलट उलट माघारा गड्या फिर गोते खासी
भरला पूर मायेचा लोंढा वाहुनिया जाशी
अविद्येचा पूर गड्या वेगी ओसरे ना
कल्पना सुसरीची मिठी सोडता सुटेना
क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही
दुर्लभ नतनु गेल्यावरती होशील पश्चताई
म्हणे मुक्ताई जाणं चांगया अंतरीची खूण
जा सद्गुरु शरण तुझ नेतील तरुन
संत मुक्ताई...
रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी..संत मुक्ताईच्या योगी चांगदेवाला केलेला उपदेश.. भव नदीचे पाणी रे गड्या..या अभंगावर बाळकृष्ण दादांनी केलेले कीर्तन.विषय "अद्वैत भक्ति मार्गाचा सिद्धांत"
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- मृदंगाचार्य,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
हार्मोनियम..अधिक शिंदे कराड.
या कीर्तनाचे आणखी एक वैशिष्ठ्य असे की दादांचे चिरंजीव पद्मनाभ यांनी आधिष्ठानच्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये audio procesing आणि balancing केलेले आहे..हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ https://youtu.be/cFymwc-K0ME
संपूर्ण काकडा https://youtu.be/9LGOj097U-s
काकडा भाग 1 https://youtu.be/VtPwbu-U0F4
काकडा भाग 2 https://youtu.be/CbPgu7Y2Pug
काकडा भाग 3 https://youtu.be/XEyDcOTXSTg
काकडा भाग 4 https://youtu.be/XIynFiF_JDY
काकडा भाग 5 https://youtu.be/GUYHqENDUoU
काकडा भाग 6 https://youtu.be/shYvRsXJFqw
काकडा भाग 7 https://youtu.be/DHuOgEPdIaA
काकडा भाग 8 https://youtu.be/etea38JVrH4
काकडा भाग 9 https://youtu.be/EYzkekZqIio