MENU

Fun & Interesting

मान्सून सक्रीय परंतु पावसाचे प्रमाण कुठे, किती ? #हवामानअंदाज १६ जून २०२५ #मान्सून

Video Not Working? Fix It Now

🌧🌧हवामान अंदाज🌧🌧 👉 या आठवड्यात मान्सून सक्रिय होत आहे त्यामुळं विदर्भ खान्देशातील वाढलेलं तापमान हे कमी होईल तसेच पूर्व विदर्भातील वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गडचिरोली खान्देशातील नाशिक जळगाव नंदुरबार व लगतचा अहिल्यानगर व संभाजीनगरचा भाग व कोकण कोकण लगतच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मध्यम ते चांगल्या पावसाचा अंदाज असून पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात सुद्धा हलक्या पावसाचा या आठवड्यात आहे. फक्त दक्षिण मराठवाडा जिथे आधीच भरपूर पाऊस झाला आहे तिथं पाऊस कमी राहील असे या आठवड्याचा अंदाज आहे. 👉 स्थानिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी योग्य ओलावा आहे ७५ ते १०० मिली मीटर पाऊस पडून जमिनी थंड झाल्या असतील तर स्थानिक परिस्थितीनुसार तिथं पेरणीचा निर्णय शेतकरी घेऊ शकतात. 👉 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रिस्क घेण्याची तयारी असल्यास कोरड्यात कापसाची लागवड जिथे झाली नाही तिथे रिस्क घेण्याची तयारी असल्यास धूळ पेरणी कापसाची सुद्धा करू शकता.

Comment