कोकणातील कांदळगाव गावातील दसरा उत्सव॥देवता लग्नसोहळा॥देवी सातेरी आई #दसरा #sindhudurg #कांदळगाव#amitvengurlekarvlogs
#देवीसातेरी
#देवरामेश्वर
spl thanks vishal rane @vishalrane8276
@amitvengurlekar
#amitvengurlekar
कांदळगावची दसरा,शिवलग्न सोहळा आणि सोन लुटण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी l Sindhudurg
मालवण तालुक्यातील कांदळगावातील श्री देवी सातेरी मंदिर फारच प्राचीन आणि कित्येक पिढ्यांपासून इथे अस्तित्वात आहे. जून मंदिर मातीच्या भिंती,शेंणाने सारवलेला सभामंडप आणि जून कौलारू छप्पर मंदिराच नव्याने जीर्णोद्धार हल्लीच मागच्या काही वर्षांपूर्वी झाला आहे. मंदिराची पूजाअर्चा आणि इतर सर्व गोष्टी सांभाळण्याची जबादारी ही गावातील बाबले नारे परब ह्यांच्या घराण्याकडे आहे.कांदळगावच्या बारा-पाच देवस्थानापैकी हे आई सातेरी देवीची मंदिर. घटस्थापने दिवशी मंदिरात घटाची स्थापना केली जाते. कुळकर राणे आणि परब ह्यांना त्यावेळी आणि आठव्या दिवशी असलेल्या होमाच्या पूजेचा मान असतो. नवमीला मंदिरात सर्वांसाठी महाप्रसाद असतो. दसऱ्या दिवशी आईला साडी चोळी दागदागीन्यांनी छान सजवल जाते. दुपारी राणे-परब मानकरी ह्यांची आधी देवी समोर खणा नारळाने ओटी मानवली जाते त्यानंतर मग इतर गावातील ग्रामस्थांच्या आणि मग पंचक्रोशीमधून आलेल्या भाविकांच्या ओट्या भरल्या जातात.
instagram : amitvengurlekarvlogs
facebook : amitvengurlekarvlogs
#kokan
#malvan
#sindhudurg
#gaav