MENU

Fun & Interesting

रोज देवाची पूजा कशी करावी | पंचोपचार पूजन | षोडशोपचार पूजन | राजोपाचार पूजन | नित्य - नैमित्तिक पूजन

Video Not Working? Fix It Now

1) नित्य पूजा कशी करावी देव पूजा हा एक  आचार आहे.... एक आचरण पध्दती    उप - आचार   मानस पूजा प्रत्यक्ष पूजा -  नित्य पूजा / नैमित्तिक पूजा 1) पंचोपचार, 2)  षोडशोपचार, 16 ( शोडोपचार x ) 3) राजोपचार!!!  रोज ची पंचोपचार पूजा करु शकतो. काही विशेष दिवशी उपाध्यायांच्या देखरेखीखाली जी पूजा केली जाते  ती षोडशोपचार पूजा / राजोपचार पुजा  शुचिर्भूत होणे - आसन सिद्धी - दीप - धूप -  निर्माल्य - विसर्जन उत्तर दिशा - कनिष्ठ देवता - थोडी फुले सुवास घेणे। शंख घंटा - दिशा -  देव स्नान घालणे - ओली पूजा / कोरडी पूजा.  पंचोपचार पूजा (५ प्रकराचे उपचार) १) गंध (चंदन, अष्टगंध, गोपीचंदन)  २) पुष्प (फुले) - सुकलेली x उलटी x आवडीची बेस्ट - स्वतः लावलेली श्रेष्ठ - विकत - गौण - दुसऱ्याच्या बागेतील x किडलेली/  रस्त्यावरील / पडलेली/ चोरलेली - पुष्पदंत - गंधर्व राज कथा  ३) धूप (अगरबत्ती, ऊदबत्ती, धूपकांडी)  ४) दीप (गाईच्या तुपाचे नीरांजन) ५) नैवेद्य (नुसती साखर, गाईचे दूध व साखर इ.) षोडशोपचार पूजा (१६ प्रकारचे उपचार) १) आवाहन  (प्रतिमेमध्ये येण्याची देवाला विनंती करणे) २) आसन (बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करणे व स्थानापन्न होण्याची विनंती देवाला करणे) ३) पाद्य (देवाची पावले धुणे) ४) अर्घ्य  (देवाला हात धुण्यासाठी सुगंधी पाणी देणे) ५) आचमन (देवाला पिण्यासाठी पाणी देणे) ६) स्नान (देवाला विविध द्रव्यांनी आंघोळ घालणे - यात पंचामृत पण येते) (या नंतर देवाच्य आवडत्या सुक्तांनी अभिषेक केला जातो जसे गणेश - अथर्वशीर्ष, देवी श्री सुक्त, विष्णू - पुरुष सुक्त, शंकर - रुद्र सुक्त.... )  ७) यज्ञोपवित (जाणवे घालणे)  8) वस्त्र (देवाला अधरीय नेसवणे)  उपवस्त्र (देवाला उत्तरीय नेसवणे) ९) गंध (देवाच्या कपाळाला गंध लावणे १०) पुष्प (देवाला आवडतील अशी त्या त्या ऋतूत उपलब्ध असलेली ताजी फुललेली, निरोगी फुले वाहणे) ११) धूप (उदबत्ती पेटविणे व तिने देवाला घंटा वाजवित ओवाळणे) १२) दीप (तुपाची वात पेटविलेले नीरांजन देवापुढे घंटा वाजवित ओवाळणे) १३) नैवेद्य ( वाटीत दुधसाखर वा मिठाई ठेउन व तुळशीचे पान घालून त्याद्वारा आपले पंचप्राण अर्पण करणे) १४) प्रदक्षिणा (स्वतःभोवती / मंदिरात देवाभोवती देव उजव्या हाताला ठेवून नमस्कारासहित चालणे) १५) नमस्कार (हात जोडणे व डोके नमविणे / अष्टांग टेकवून) १६) मंत्रपुष्प (मंत्र म्हणत फुले व अक्षता वाहणे) राजोपाचार पूजन - देव / देवी राजा - सिंहासन छत्र चामर वाद्य आवरण पूजन अंग पूजन या सह।

Comment