"मराठी भाषा गौरव दिन"
दिनांक : २७/२/२०२४
नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मा. प्राचार्य महेश्वरी चौगुले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता समारंभ व मराठी राजभाषा गौरव दिन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.