श्री माणकेश्वर मंदिर,पेठ,ता.वाळवा,जि.सांगली,अप्रतिम मंदिर, उंच गोपुराचे अत्युउत्कृष्ट महाद्वार
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एनएच ४ अर्थात ए एच 47 च्या पश्चिमेस लागूनच असलेल्या पेठ गावात श्री माणकेश्वर देवस्थान आहे. श्री माणकेश्वर चे मंदिर आंतरबाह्य अप्रतिम आहे. महाद्वार उंच गोपुराचेआहे. त्यावर विविध देवदेवता, अप्सरा , यक्षगण, इत्यादींच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. त्यांची रंगसंगती विलक्षण आकर्षक आहे. तीळ गंगा नदीच्या काठावर हे नितांत सुंदर मंदिर आहे. मंदिरात श्री माणकेश्वर देवाची सुंदर मूर्ती आहे. तसेच मंदिरात आणि मंदिराच्या बाहेरच्या उंचच उंच भिंतीवर अतिशय रेखीव अशा देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मूळ मंदिर सोळाव्या शतकात उभारले गेले आहे. तर २०२४ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे काम सुमारे चार वर्षे चालू असल्याचे सांगण्यात आले. अजूनही काही काम चालू आहे.
सदर सुंदर व्हिडिओ मध्ये आपणास सर्वांचे सविस्तर दर्शन घडेल स्थापत्य शैली पाहून मन अचंबित होईल., यात शंका नाही.