राज्याच्या मंत्रीमंडळात गावगुंड, हा मंत्री तर --- : 'सामना'ने उडवली खळबळ (Jayakumar Gore offensive photo case)
Maharashtra's Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis is still the Chief Minister and Home Minister, but are many village goons in the state dancing on the couch of the 'Aakans', the law and the police? This question has been raised by the people. Jayakumar Gore, a minister from Satara, has wreaked havoc with mob rule. Misusing power and police force, Gore filed false cases against local journalist Tushar Kharat and forced him to be arrested. Tushar Kharat exposed a dirty case of Gore. A housewife from Satara has complained to the police and Raj Bhavan about Gore. The woman says that Gore had in a way molested her by sending her nude photos on her mobile phone. When the woman went to court, Gore prostrated himself in the court, apologized and pleaded to withdraw the case. After promising not to bother her again, the woman withdrew the case. This does not mean that Jayakumar Gore was acquitted in this molestation case. While the court order did not say that Gore is innocent, Gore misled the House by falsely claiming that he was acquitted in this case and Gore should be prosecuted for violation of rights. This is what the editorial says. At the same time, YouTube's Tushar Kharat has taken the side of Lai Bhari... Minister Gore has misused his position and filed many serious crimes against journalist Tushar Kharat... Crimes like extortion, molestation, atrocities.... It is a despicable attempt to uproot a young journalist from his life. Saying this, the editorial of Saamana has taken the side of Tushar Kharat and tried to give him strength. If Kharat has done something wrong, the concerned person can take legal action against him and can file a case of uncivility. Gore has directly violated his rights. This is also acceptable, but Gore's anger was so great that he filed several cases against Kharat and added such clauses that Kharat should never be released. This is a despicable attempt to resurrect a young journalist. This is what the editorial in Saamana says.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तरीही राज्यातील अनेक गावगुंड त्यांच्या मंत्रिमंडळात असून कायदा आणि पोलीस या 'आकां'च्या कोठीवर नाचत आहे काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्याने झुंडशाहीचा कहर केला आहे. सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडले. तुषार खरात यांनी गोरे यांच्या एका घाणेरड्या प्रकरणास वाचा फोडली. साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेने गोरे यांच्या संदर्भात पोलीस आणि राजभवनात तक्रार केली. गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंगच केला, असे ती महिला म्हणते. ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली व खटला मागे घेण्याची विनवणी केली. यापुढे पुन्हा त्रास देणार नाही असा शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला. याचा अर्थ या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नाही. कोर्टाच्या आदेशात गोरे निर्दोष आहेत असे म्हटले नसताना गोरे यांनी विधानसभेत आपण या प्रकरणात निर्दोष सुटल्याचे खोटेच सांगून सार्वभौम सभागृहाची दिशाभूल केली व त्याबद्दल गोरे यांच्यावरच हक्कभंगाचा खटला चालवायला हवा. असं या अग्रलेखात म्हटलं आहे. त्याचबरोबर तुषार खरात यांची बाजू उचलून धरलेली आहे. मंत्री गोरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून खरात या पत्रकाराच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे लावले आहेत. खरात यांनी काही चुकीचे केले असेल तर संबंधित व्यक्ती त्यांच्यावर कायद्याने कारवाई करू शकते बेअदवीचा खटला दाखल करू शकते. गोरे यांनी तर त्यांच्यावर थेट हक्क भंग आणला. हे सुद्धा मान्य, पण गोरे यांचा सुडाग्नी इतका पेटला की, त्यांनी खरात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून अशी कलमे टाकली की, खरात यांची कधी सुटकाच होऊ नये. एका तरुण पत्रकाराला आयुष्यातून उठविण्याचा हा नीच प्रयत्न आहे. असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
-------------
#ajitpawar #bjpnews #politicaldrama #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ncpmaharashtra #uddhavthackerayspeech #nileshlankeofficial #maharashtraassemblyelections #shodhnewsmarathi #ashokgodage #solapurnews #ncpmaharashtra #bjpmaharashtra #mahavikasaghadi #maharashtramla #shindegroup #shindecamp #pranitishinde #samadhanautade #maharashtralegislativeassembly #legislative_assembly #chhaganbhujbal #supriyasulefc #electionnewslive #rohitpawarspeaks #pandharpur_news_channel #shivtirth #uddhavthackeraylive #marathinews18 #tv9marathilve #uddhavthackerayspeech #adityathackeray #samana #omrajenimbalkar #sanjayrautarrested #vanchitbahujanaaghadi #solapurpolitics #marathibatmya #manojjarangepatil #anjalidamania #walmikkarad #bachhukadu #jayantpatil #suresdhas #jitendraawhad #anajipant