ब्रेकफास्ट, लंच किंवा डीनर, कधीही बनवा असा पदार्थ टोमॅटो आम्लेट | Tomato omelet | लीनाज सुगरणकट्टा
#टोमॅटोआमलेट #नाश्ता #पोटभरीचापदार्थ #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
टोमॅटो आम्लेट
२वाट्या चणाडाळीचे पीठ
पाव वाटी तांदळाचे पीठ
२ टोमॅटो
१ बारीक चिरलेला कांदा
१ तिखट हिरवी मिरची
अर्धा इंच आले
बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा हळद
दीड चमचा तिखट
१ चमचा साखर
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरेपूड
१ चमचा ओवा
चवीनुसार मीठ.
मिक्सरच्या छोट्या भांड्यात एक टोमॅटो, हिरवी मिरची, आले वाटून घ्यावे.
एक टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
आता एका बाऊलमध्ये वरील सर्व जिन्नस घालावे. त्यात केलेली टोमॅटो मिरची आल्याची पेस्ट घालावी. ओवा घालताना तो थोडा हाताने चोळून मग घालावा.
मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून परत एकदा फिरवून घ्या. यामुळे मिक्सरच्या ब्लेडच्या खाली लागलेले मिश्रणपण पाण्यामुळे स्वच्छ होते.
आता हे पाणी पण बाऊलमध्ये घाला. आणि जसे पाणी लागेल तेवढे वापरून डोसा बॅटर एवढे पातळ करा.
तवा मध्यम आचेवर गरम करून घ्या.
डावाने तव्यावर गोलाकार पद्धतीने हे बॅटर घाला. हे बॅटर डोशासारखे खूप पसरवायचे नाही.
कडेने तेल किंवा तूप सोडा. (नॉनस्टिक तव्यावर गरज नाही.)
कडेने होत आला की पलटवून दुसरी बाजू पण भाजून घ्या.
हा गरमागरम खूप छान लागतो. बरोबर टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी.. काहीही द्या.
टोमॅटो आम्लेट सॅण्डविच पण छान लागते.
दोन ब्रेडचे स्लाईस घ्या. दोन्हीला आधी बटर लावा. मग एकाला सॉस आणि दुसऱ्याला हिरवी चटणी लावा. मधे हे टोमॅटो आम्लेट कापून ठेवा. आणि मस्त टोमॅटो आम्लेट सॅण्डविच करून खा.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040