संत वचनामृत मंडळ आयोजित
सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूर कर यांच्या रसाळ वाणीतून
नारद भक्ती सूत्र
दुसरा दिवस..
ईश्वर आणि मनुष्य यांच्या व्याख्या सांगत नारदाची भक्ती सूत्रे मांडतांना आज महाराजांनी खुप उदाहरणे दिली. शिवोहम् केवळ म्हणून चालत नाही तर ईश्वराच्या प्राप्तीसाठी भक्ती हाच मार्ग आहे पण ती कशी असावी याचे सविस्तर विवेचन आज महाराजांनी केले.
मारुतीराय, संत एकनाथ,संत तुकाराम महाराज, संत जनाबाई यांच्या चरित्राची उदाहरणे देत संताच्या ठिकाणी असलेले अमृतत्व विषद केले. देवाची भक्ती घडावी आणि देवाचे मनोरंजन व्हावे म्हणून 84 लक्ष योनीतून जीव भगवंताची विविध रूपातून भक्ती करत आहे हे सांगताना महाराजांनी सिद्धी बद्दल सांगितल.
खर तर मी खुप त्रोटक सांगत आहे.
पण काल आज जे हजर होते त्यांनी ज्ञान वैराग्य भक्ती चा अनुभव घेतला. ज्यांना येणे जमले नाही त्यांनी काय गमावले हे शब्दात सांगणे अवघड आहे. कारण अनुभवाचा भाग आहे. असो आता उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि हो संधी पुन्हा पुढच्या वर्षी मिळणार आहे.
उद्या नक्की या..
तरुण मंडळींनी नक्की यावं..
हे खर तर आमच्यासाठी आहे..
आपल्यासाठी आहे..
जीवनाला मार्गदर्शक अशी ही ज्ञानगंगा आहे.
याचा लाभ घ्या...