MENU

Fun & Interesting

07 सत्यपाल महाराज सप्तखंजरी तुफानी विनोदी कीर्तन,,समापन अमरावती आयोजक मा, रवी भाऊ राणा, नवनीत राणा

Video Not Working? Fix It Now

व्हिडीओ , :- शिरीषकुमार पाटील अमरावती मो, ९४२१८१८६९५ प्रमुख पाहुण्यांचे आगमन आयोजक मा, आमदार रवी भाऊ राणा आणि मा. राज्यमंत्री कांबळे साहेब महाराष्ट्र सरकार भाग ४ सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२) सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत. सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात झाडू घेत स्वच्छता करून आणि हातात खंजिरी घेत कीर्तनातून महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे. जन्म व कारकीर्द इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावातील एका शिंपी कुटुंबात सत्यपाल चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते लहानाचे मोठे झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली. अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो. आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे. भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर हनुमंत उपरे हे स्वागताध्यक्ष होते. पुरस्कार सत्यपाल महाराजांना खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत: दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाद्वारे समाज प्रबोधनकार पुरस्कार

Comment