#MugdhaGodbole #VinodSatav #WomankiBaat
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक 'स्त्री' असते असं आपल्याकडे म्हटलं जातं, यशस्वी पुरुषांपेक्षा 'प्रत्येक यशस्वी गोष्टीमागे स्त्री असतेच' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आरपारचे एक लाख सबस्क्रायबर्स होण्यामागे 'वुमन की बात'चा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक स्त्री एकावेळी अनेक भूमिका बजावत असते, दहा गोष्टींचा विचार डोक्यात सुरु असतांनाही ती हसतमुख राहून सगळ्यांना सकारात्मकता देत असते, करियरमध्येही यशाचे टप्पे गाठत असते, पण हे साध्य कसं होतं? उपजतच असतं की कष्टाने साध्य केलेलं?
यामागे वैचारिक भूमिका काय असते? हे सगळं जाणून घेण्यासाठी सुरुवात झाली, 'वुमन की बात'ची! 'वुमन की बात'मध्ये उत्तम लेखिका, अभिनेत्री मुग्धा गोडबोले आणि लिड मीडियाचे संस्थापक विनोद सातव यांनी अनेक महिलांना बोलतं केलं, म्हणूनच एक लाखाच्या टप्प्यावर या दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या आहेत. विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांच्या मुलाखती घेण्याचे त्यांचे अनुभव, मुलाखतीनंतरच्या प्रतिक्रिया, काही पडद्याआडच्या गमतीजमती सांगणारा असा हा एपिसोड! शिवाय उत्तम लेखिका, मुलाखतकार आणि एक यशस्वी महिला म्हणून मुग्धाचेही विचार या एपिसोडमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील, त्यामुळे हा एपिसोड शेवट्पर्यंत नक्की बघा.