MENU

Fun & Interesting

#सर्वांगी सुंदर भजने भाग-1 #Sarvangi Sunder Bhajane Part- 1#भजन सम्राट कै.विलासबुवा पाटील -ORIGINAL

Video Not Working? Fix It Now

PRASHANT GADADE ENTERTAINMENT UNION MUSIC CO. ( UMC CO.) कोकणचे अनमोल रत्न भजनसम्राट कै. विलासबुवा पाटील यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलेली भजने " स्वामी समर्थ भजन मंडळ " यांच्यातर्फे ऐका आणि आनंद घेऊन भक्तीच्या रंगात रंगून जा! 1) सर्वांगी सुंदर गणपती 2) छुन, छुन, नाचे गजानन 3) ओंकार प्रधान रूप गणेशाचे ( संत तुकाराम महाराजांचे अभंग ) 4) कोकणातल्या महाराजांनी वर्णीला गणपती 5 )या कान्हाने मारल्यान धोंडो ( गवळण) 6) शेत राखी देवा विठ्ठला ( संत नामदेवांचे अभंग ) 7) गौरी गणपतीचा सण आले चाकरमानी हौसेनं - ( कोकणातील गौरी गणपतीच्या सणाला कोकणी कुटूंब ,डोळ्यात आनंदाश्रू आणून चाकरमान्यांची आठवण काढून, वाटेवर डोळे लावून,त्यांच्या येण्याची आवर्जून वाट पाहत असतात! चाकरमानी देखील कुटूंबासोबत घरातल्या गौरी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी गहिवरलेल्या मनाने कुटूंबाला भेटण्यासाठी तडफडत असतात ! आणि मिळेल त्या गाडीने चेंगराचेंगरीत, लटकून, लोंबकळून ,जमेल त्या परिस्थितीत घरच्या कुटूंबाच्या ओढीने येतात! इतके एकमेकांवरचे प्रेम क्वचितच या जगात सापडेल ! याकाच म्हणतात, धरतीवरचो स्वर्ग !म्हणजे आमचो कोकण! 8)रखुमाई रूसली पांडुरंगावरी ( पद्मभूषण भजन सम्राट चंद्रकांतबुवा कदम यांच्या " रखुमाई रूसली ,कोपर्‍यात बसली " या भजनाला अनुसरून हे भजन आहे! जरूर ऐका! 9) " धाव रे गणा, पाव रे गणा - गणपतीपुळे तुझं गाव रे गणा "( जाखडीनृत्यावर आधारित ) हे गाणं गीतकार श्री प्रशांत गडदे याने रचले आहे!आणि माझ्या शब्दाला मान देऊन भजनसम्राट कै. विलासबुवा पाटील याने हे गणपतीपुळ्याचे गजर गाऊन सुपरहिट केले आहे! मी त्यांचा शतशः आभारी आहे! कै. विलास बुवा पाटील , कै. चंद्रकांतबुवा कदम, कै.परशुराम पांचाळ, कै. स्नेहलबुवा भाटकर , कै. खोपकरबुवा आणि इतर सर्वच बुवा यांच्यासारखे अनमोल कोहिनूर हिरे ,हजारो, लाखो वर्षानेच आम्हच्या कोकणात जन्मास येतात! तसेच आम्हच्या श्रोत्यांना लाख, लाख, धन्यवाद! वाद्यवृंद : मृदुंग : दादा परब, गणेश सावंत तबला : सदा मुळीक झांज,टाळ : नारायण ठाकूर कोरस :बबन हळबे, सुनिल जाधव, नारायण म्हेतर, राजन मुणगेकर, राजेंद्र राणे, मनोहर कदम, सुहास सुर्वे, अनिल मेस्त्री, प्रकाश सावंत प्रस्तुतकर्ता : प्रशांत गडदे - 9702707071 स्टुडिओ : ओडियोजेनिक ध्वनिमुद्रक : अविनाश मोने

Comment