100% कॅल्शियमचे स्त्रोत। दिवसभर स्टॅमिना टिकून ठेवणारी हेल्दी अशी नाचणीची आंबील । Nachnichi Ambil.
nachniche ambil
nachniche ambil recipe in marathi
nachaniche ambil recipe
nachani ambil benefits
नाचणीचे आंबील कशी करायची
नाचणीचे आंबील रेसिपी
साहित्य :
1.दोन चमचे नाचणीचे पीठ
2.बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर
3.मिरची
4.कढीपत्त्याची दोन पाने
5.लसणाच्या 7-8 साली सकट कुड्या
6.जिरे ,मोहरी ,हळद ,हिंग ,काळे खडे मीठ.
7.अर्धा लिटर ताजे ताक
8.अर्धा तांब्या पाणी
कृती:
सर्वप्रथम रिकाम्या वाटीमध्ये दोन चमचे नाचणीचे पीठ घालून त्यामध्ये मिक्सिंग होण्यापुरतं पाणी घालून मिक्स करायचं आहे .मिक्सिंग करताना त्यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये असे मिक्सिंग करून घ्या.यानंतर त्यावर झाकण ठेवून थोडावेळ भिजत ठेवा .यानंतर मित्रांनो नाचणीचे पीठ भिजेपर्यंत लसणाच्या कुड्या आणि मिरची बारीक चेचून तिची पेस्ट करा व भांडे चुलीवर ठेवून घ्या चूल नसल्यास गॅसवर ठेवू शकता. मित्रांनो त्या भांड्यामध्ये एक चमचा तेल घाला मोहरी, जिरे ,तडतडण्या इतपत घाला .आता मित्रांनो त्यामध्ये मोहरी घाला मोहरी तडतडल्यास जिरे घाला लागोपाठ पाव चमचा हिंग,मिरची लसूण ची पेस्ट घाला, कढीपत्त्याची पाने घाला, आता मित्रांनो त्यांना छान पैकी परतून घ्या, यानंतर मित्रांनो त्यामध्ये भिजवलेले नाचणीचे पीठ घालून घालावे त्यासोबतच त अर्धा तांब्या पाणी घाला. त्यामध्येच चवीनुसार काळे खडे मीठ घाला , यानंतर पाव चमचा हळद घाला मित्रांनो आता त्याला उकळी येईपर्यंत ढवळून घ्या, जर ढवळले नसल्यास त्यामध्ये गाठी होऊ शकतात मित्रांनो आता आपली आंबील उखळली असल्यास चुलीवरून खाली उतरून घ्या व थंड होण्यास ठेवा .थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धा लिटर ताक घाला आणि आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आता त्यांना ढवळून घ्या आता मित्रांनो आपली आंबील पिण्यास तयार झाली आहे.
मित्रांनो जर तुम्ही आंबील केला तर तुमची आंबील कशी होते ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.
मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.
#GopusHealthyKitchen#nachnicheambilrecipe#नाचणीची आंबील रेसिपी मराठी