https://www.youtube.com/watch?v=58_Bor8KFgs
#haripath #Lyrics #haripath #marathi
Singer: Sanjay
Music Director: Sanjay
Lyrics: Traditional
Album: Haripath
Music Label: DYMPlus
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @HaripathMarathi