कोकणातील अनोखी देवमाळ्यातील 'देवशेती' 300 एकरात फक्त झऱ्याच्या पाण्यावर होते पारंपारिक वायंगणी शेती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी हे एक निसर्गसंपन्न गाव.या वायंगणी गावात हिवाळ्यात झऱ्याच्या पाण्यावर देवमळ्यात सुमारे 300 ते 350 एकर एवढ्या क्षेत्रात देवशेती केली जाते.तळकोकणात हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या भातशेतीला वायंगणी शेती म्हटले जाते. आणि याच वायंगणी नावावरुन गावालाही वायंगणी नाव पडलं असावं.या शेतीची मुख्य बाब म्हणजे शेती सुरवात ते शेवट,म्हणजे नांगरणी,पेरणी,लावणी,कापणी हे सर्व टप्पे देवाला विचारून कौल लावून सुरू केले जातात.या शेतीची सुरक्षा देव करतो.गावची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ.या देवशेती मध्ये संपूर्ण गाव सामूहिकपणे शेती करतो,संपूर्ण गाव एकत्र आल्यामुळे मळ्यात जणू जत्राच भरली आहे असं वाटतं.
या देवशेती ची सुरवात हिवाळ्यात देवाचा कौल लावून केली जाते मग पुढील कामे टप्याटप्याने होतात.इथे बारमाही वाहणारे झरे आहेत गावातील लोक त्या झऱ्यांना नागझर बोलतात.पूर्वजांनी या झऱ्यांच्या पाण्याचे नीट व्यवस्थापन करून त्याचा उपयोग शेती साठी केला त्यामुळे इकडे वर्षातून दोन वेळा भातशेती केली जात होती पण आता एकदाच शेती केली जाते.शुद्ध झऱ्यांच्या पाण्यावर केलेल्या या शेतीच उत्पन्न देखील चांगलं येत.
या वायंगणी गावातील गावकऱ्यांनी पूर्वजांनी चालू केलेली ही देवशेतीची परंपरा अजून चालू ठेवली आहे आणि पुढे चालू ठेवतील....
#farming #देवशेती #वायंगणी