MENU

Fun & Interesting

पहिल्याच आठवड्यात 300 कोटींची कमाई करत, Chhaava Movie भारतात आणि भारताबाहेर हिट कसा झाला ? #Chhaava

BolBhidu 182,535 21 hours ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #Chhaava #VickyKaushal पहिल्या दिवशी जवळपास ३० कोटींची कमाई करणाऱ्या छावानं एक एक करत अनेक रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली, ३ दिवसात शंभर कोटींच्या कमाईचा आकडा गाठणारा छावा आणखी कोणते रेकॉर्ड्स तोडणार याची चर्चा होती. एकतर २०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी म्हणावं इतकं भारी सुरु नव्हतं, पण छावा आला आणि बॉक्स ऑफिसला बूस्टर मिळाला. कमाईचे रेकॉर्ड तुटत गेले आणि छावा पिक्चरची हवा होत गेली. फक्त बॉक्स ऑफिसवर नाही, तर सोशल मीडियावर सुद्धा छावाच चर्चेचा विषय आहे, दोन मित्र भेटले तरी कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा या छावा बद्दलच्याच आहेत. थोडक्यात काय तर छावानं टीझरपासून होणाऱ्या चर्चा खऱ्या ठरवत धुव्वा केला आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांवर याआधी मराठीमध्ये पिक्चर आले होते, हिंदीमध्ये ऐतिहासिक पिक्चर करायची सुद्धा लाट आहे, पण तरीही छावाच एवढा का चालला ? फेब्रुवारी २०२४ मध्ये 'छत्रपती संभाजी' हा पिक्चर थिएटरमध्ये आला होता. हा पिक्चर तयार झाला होता ९ वर्ष आधी, तेव्हा संभाजी १६८९ या नावानं पिक्चरची चर्चा सुद्धा झाली होती, मग फेब्रुवारी २०२४ मध्ये नव्या नावानं आणि ५ भाषांमध्ये हा पिक्चर थिएटरमध्ये आला, पण चालला नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज- भाग १' हा पिक्चर थिएटरमध्ये आला, याची कमाई बऱ्यापैकी झाली, लोकांमध्ये चर्चा सुद्धा होती, पण पुष्पा टू रिलीझ झाला आणि त्यानं वनसाईड सगळं मार्केट ओढलं. आता या दोनी पिक्चर बनवणाऱ्यांनी मेहनत घेतली होती, पिक्चरची पब्लिसिटी सुद्धा केली होती, मग तरीही छावालाच थिएटरमध्ये गर्दी जमवणं कशामुळं जमलं ? या दोन्ही पिक्चरशी तुलना सोडली तरी ऐतिहासिक पट असणारा छावा पहिल्याच आठवड्यात ३०० कोटींची कमाई कशी करु शकला ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment