फक्त"२ मिनिटांत" मिक्सर मधे उकड मळा, एकावेळी4-5पाऱ्या बनवा,आजचे मोदक उद्यासुद्धा मऊ लाण्यासाठी उपाय
नमस्कार गणपती बाप्पा साठी मोदक बनवताना अडचण कुठे येते ?
१)उकड गरम गरम मळावी लागते मग त्याचे हाताला चटके बसतात
- हाताला चटके बसू नये म्हणून मी 2 पद्धतीनं उकड मळून दाखवली आहे
२)उकड मळली की लगेचच त्याचे मोदक बनवावे लागते नाहीतर उकड कोरडी पडते
- उकड मळल्यानंतर 4,5 तास सुद्धा जशास तशी मऊ राहील त्यासाठी ती कशी ठेवायची ते सांगितलं आहे .
३) मोदकाच्या पाऱ्या बनवायला खूप वेळ लागतो
- एकाचवेळी 5 पाऱ्या कशा बनवायच्या याची सोप्पी पद्धत या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे.
४) आजचे मोदक उद्या खाताना कडक लागतात
- आजचे मोदक उद्या खाताना सुद्धा मऊसूत लागतील यासाठी एक सोप्पा उपाय दिला आहे.
मोदक बनवताना येणाऱ्या सर्व अडचणी तर दूर झाल्या
आता वेळेचं काय
सारण किती वेळ शिजवायच?
उकड किती वेळ काढायची?
मोदक किती वेळ उकडायचे?
या सर्वांसाठी परफेक्ट टायमिंग सांगितला आहे आणि सोबत छोट्या छोट्या टिप्सही दिल्या आहेत मग मोदक सुंदर आणि सुबकच होणार ,मग काय देवाऱ्यातले गणपत्ती बाप्पा खुश आपणही खुश आणि घरातले इतर मोदक खाऊ गणपती बाप्पाही खुश 🙂
** साहित्य **
सारण
साजुक तूप -1टीस्पून
खसखस - 1टेबलस्पून
खोवलेल खोबरं - 2कप
गूळ - 1कप
जायफळ पूड - 1/4टीस्पून
आवरण
साजूक तूप - 1टीस्पून
पाणी- 1/2cup
दूध - 1/2कप
मीठ - चवीनुसार
साखर - 1टेबलस्पून
तांदळाची पिठी - 1कप