#संतगाडगेबाबा #प्रेरणादायी #stayinspiredmarathi
● गाडगे बाबांची थोडक्यात माहिती
◆ संत गाडगे बाबांचा जन्म:
२३ फेब्रुवारी १८७६ कोतेगाव (शेंडगाव) येथे झाला. ते गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.
संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
सामाजिक सुधारणा : १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
● मृत्यू
लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
◆ "संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश"
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
|| गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला ||
● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
🎯 चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi
https://youtu.be/mvn494AdNXo
___________________________________
🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi
https://youtu.be/VCxbyNtO1sI
___________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
https://youtu.be/kJ2_NmZYe5g
____________________________________
🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
https://youtu.be/rvYmnAV0tiU
____________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
https://youtu.be/7BhgzgYTVj8
____________________________________
🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
https://youtu.be/sCI1NpirzZ0
____________________________________
🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
https://youtu.be/u6RrxsLtRKw
____________________________________
🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
https://youtu.be/XFU-WKaV2ic
____________________________________
🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
https://youtu.be/DiF9XD3Rb1Q
____________________________________
● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
● For Copyright Matter, please Email us - [email protected]