ह्या पॉडकास्ट चे गेस्ट पाळंदे काका म्हणजे डोंगरयात्राकार म्हणून विशेष ओळख असलेले ज्येष्ठ गिर्यारोहक आणि लेखक : आनंद पाळंदे !!!
सर्व भटक्यांना प्राणप्रिय असलेला सह्याद्री ग्रंथ म्हणजे " डोंगरयात्रा " डोंगरयात्रा.. ज्याच्या घरी नाही तो कसला भटक्या..!
सोशल मीडियाचा जन्मा अगोदर डोंगरयात्रा ग्रंथ डोळ्यासमोर घालत आजवरच्या असंख्य भटक्यांनी सह्याद्री मनसोक्त भटकला आहे.
पाळंदे काका म्हणजे एका दिपस्तंभा सारखं व्यक्तिमत्व..सालस...लोभस अगदी निष्काम योग्या सारखं. स्वच्छ.. निर्मळ..प्रवाही. खळखळतं...हलतं...डुलतं
७०-८०-९० दशकात सरकारी नोकरी सांभाळून सह्याद्रीचा कानाकोपरा फिरणं काय साधी गोष्ट आहे...? ते सुद्धा कुठलाही सोर्स उपलब्ध नसतांना..
दळणवळणाची साधने अपुरी असताना.. हा भटकण्याचा खडतर यज्ञ तेवत ठेवणे काय एवढे सोपे होतं..?
भटकण्याचा आनंद दूस-याच्या झोळीत टाकण्याचे योगीकाम काकांनी निस्वार्थीपणे केलंय हे सांगण्यास कोण ज्योतिषाची गरज ?
हेच सगळं ह्या पॉडकास्ट मध्ये आहे.
ज्ञान वाटणे सोपे पण आनंद वाटणे वाटते तेवढे सोपे नाही.. त्रिवार नाही तेही चौफेर लिहिते होते.. आपल्या वाणीने मुग्ध करत ते फुलपाखरासारखे जगत आले.
आणि आज.. ते हे झगमगते भटक्यांचे विश्व न्याहाळत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते आजही नवनव्या संकल्पना मांडत असतात.
ह्यातूनच मग अश्या पॉडकास्ट ह्या माध्यमावर हजेरी लावतात आणि आपली भटकंती आपल्यासमोर मांडतात.
संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा. तांत्रिक बाजू सुधारून, पाहण्यासारखा माहितीपूर्ण पॉडकास्ट बनविण्याच्या प्रयत्न आमच्या उनाड टीम ने केला आहे. आम्हाला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल, आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सोबत आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
उनाड भटकंती आयोजित आगामी टूर्स / ट्रेक्स संदर्भात अपडेट साठी खालील ग्रुप नक्की जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/EnOtlpxsMxb3KMBtvvEELM
Connect With Us On:
→ Instagram:
Credits:
Guest: Aanand Palande (Mountaineer & Writer )
Hosts: Deva Ghanekar
Editor: Deva Ghanekar
Edit Assistant: Rati Ghanekar
Content Manager: Deva Ghanekar
Social Media Manager: Deva Ghanekar
Legal Advisor: Onkar Oak
#marathi_podcast #sahyadri #shivajimaharaj #unaad #unaadbhtakanti #podcast #मराठी_पॉडकास्ट #सह्याद्री #उनाड #उनाड_भटकंती #पॉडकास्ट #आनंद_पाळंदे #डोंगरयात्रा #आव्हान #aanand_palande #shorts #reels
#maharashtra_ig #maharashtra_clickers #travel #traveller #maharashtra_majha