उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोलीच्या सतीश खडके यांनी अनोख्या पद्धतीनं शेळीपालन केलंय.विविध कार्यक्रमांसाठी ज्याप्रमाणं स्टेज उभं केलं जातं, तसंच स्टेज त्यांनी शेळ्यांसाठी उभं केलंय, या स्टेजमुळं शेळ्यांचं शेड स्वच्छ राहतं, आणि शेळ्या रोगराईपासून दूर राहतात.