80 हजारांची मशीन घ्या, लाखो रुपये कमवा | Dalmil Machine | Business Ideas In Marathi | Shivar News 24
दालमिल व्यवसायातून आज गावातल्या गावात चांगला पैसा मिळविण्याची संधी शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीकेव्ही मिनी दालमिल यंत्र तयार केले आहे. या यंत्रातून पॉलिश आणि विना पॉलिशची दाळ तयार करता येते. साधारण या दालमिलची किंमत 80 हजार रुपये आहे. तूर, मूग, उडीद दाळ तयार करून थेट मार्केटमध्ये विक्री करता येऊ शकते. यासंदर्भात विद्यापीठाच्या अकोला येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रमोद बकाने यांनी सविस्तर माहिती दिली. सिंगल फेजवर चालणारी ही मशीन आहे. मार्केटमध्ये 100 ते 110 रुपयांप्रमाणे मिळणारी दाळ तुम्ही या मशीनमध्ये तयार करू शकता. पीकेव्ही मिनी दालमिलची किंमत 80 हजार रुपयांपासून सुरू होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संपर्क साधून या दालमिलची माहिती दिली जाईल, असे श्री. बकाने यांनी सांगितले.
#dalmilbusiness
#minidalmiludyog
#dalmilyantra
#dalmakingmachine
#PKVminidalmilyantra
#shivarnews24