माझ्या काही स्त्रीविषयक कवितांना संगीतकार अशोक जोंधळे यांनी इथे स्वरसाज चढवला असून सर्व कविता सौ.आशा जोंधळे यांनी गायलेल्या आहेत. बहिणाबाई चौधरी,मीराबाई,संत जनाबाई,वामनदादा कर्डक आदींच्या काव्याला स्वरसाज चढवून गाणाऱ्या दांपत्याचा स्पर्श माझ्याही कवितांना झाला याचा मला आनंद आहे. कवितांचे अभिवाचन मी स्वत:च केले आहे. समाविष्ट कविता आशा :
1) जातं गाणं गातं
2) आलं नहान
3) सांग माझ्या भावा
4) शेत आले भरा
5) माहेरचा झोका
6) दिवाळीचा सण
7) उभ्या उभ्या आडरातर
8) जाय तुला बोलायची न्हाय
9) नाजूक साजूक
10) देवाजीनं केली लंडी
11) या पोकळीत नव्हतो
ध्वनिमुद्रण : 09 डिसेंबर 2011