कसे जाल?
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.
कलावंतीण दुर्गाचा इतिहास.छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे पहले नाव बदलून कलावतीण ठेवले . हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चंदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते
दुर्गाची संरचना
कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे.गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळमाची म्हणले जाते. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून, मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात कोरलली गणपतीची अन् हनुमंताच्या मूर्ती आहे. तिथून पुढील वाट अजूनच रुंद आणि घसरणीची असून पुढेदगडात तासलेल्या ८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक- दिड फूट उंच पायऱ्या आहेत. कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे.पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीणीचा अखेरचा 20-25 फुटांचा "रॉकपॅच" अथवा "पिनॅकल"चा भाग आहे. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो
#viralvideo #marathi #maharashtra #forts #kalavantindurgtrek #youtube #rajdhanivlos #satara #kolhapur #sangli #explore #explorepage #adventure #treking #forts #कलावंतीण दुर्ग