How To Make Goat Mutton At Home | spicy Agri style Mutton | Homemade Mutton Curry | Recipe By Gharcha Swaad
साहित्य - ५०० ग्रॅम बकऱ्याचे मटण, ३ कांदे बारीक चिरलेले, १½ वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, १½ tea spn हळद, ३ tbl spn घरगुती मसाला, १ बटाट्याच्या फोडी, अख्खा गरम मसाला ( ७/८ लवंग, ३ मसाला वेलची, १ इंच दालचीनी, ७/८ काळीमिरी, ३/४ तेजपत्ता), हिरवी पेस्ट ३ tblspn (२ इंच आले, ९/१० लसूण पाकळ्या, २ हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर), बारीक चिरलेली कोथिंबीर, ६ tblspn तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - सर्वप्रथम मटण स्वच्छ धुवून घ्यावे. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात खडा मसाला फोडणीला घालावा. खडा मसाला तडतडल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून लालसर रंगापर्यंत परतून घ्यावा. एका बाजूला पातेल्यात गरम पाणी करून घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर त्यात हिरवी पेस्ट घालून १ मिनिटं परतून घ्यावी. त्यानंतर त्यात हळद आणि घरगूती मसाला घालून चांगले परतून घ्यावे. मसाला परतून झाल्यानंतर त्यात मटण घावे. मटण मसाल्यात चांगले एकजीव करून घ्यावे. एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटानंतर मतं पुन्हा परतून घ्यावे आणि त्यात पातेल्यातले गरम पाणी घालावे. मटण पाण्यात घोळून पुन्हा त्यावर झाकण ठेवून आता १० मिनिटे वाफ काढावी. १० मिनिटानंतर झाकण उघडून परतून घ्यावे. आता पुन्हा यावर झाकण ठेवून १० मिनिटे वाफ काढावी. १० मिनिटानंतर झाकण उघडून मटण जर माध्यम शिजले असेल तर त्यात बटाट्याचे फोड घालावे आणि एकजीव करावे. आता पुन्हा यावर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटानंतर झाकण उघडून परतून घ्यावे. ( वरील व्हिडीओ मध्ये १० मिनिटांचा वेळ चुकून आल्याबद्दल क्षमस्व ). आता यात भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण घालावे आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. आता पुन्हा वर झाकण ठेवून शेवटची १० मिनिटे वाफ काढावी. १० मिनिटानंतर गॅस बंद करावा आणि गरमागरम आगरी मटण वाफाळत्या भातासोबत किंव्हा भाकरीसोबत वाढावे. धन्यवाद !
......................................................................................................
Agri Koli Homemade Masala - https://youtu.be/5v2dGKKHXAM
RIce Roti ( Tandalachi Bhakri ) - https://youtu.be/h0JYGB1MIGg