MENU

Fun & Interesting

Abhijeet Shinde | आपण निर्यात करु शकतो का ? | Sambhaji Brigade बिझनेस कॉन्फरन्स

Sambhaji Brigade 982 3 years ago
Video Not Working? Fix It Now

मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रवीणदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून "नवी दिशा नवा विचार" बिझनेस कॉन्फरन्सचे ५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्यातील हयात रिजन्सी हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्रभरातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. चौथ्या सत्रात इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशनचे संस्थापक मा.अभिजित शिंदे यांनी “आपण निर्यात करु शकतो का ?” या विषयावर मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो "अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला” हा विचार दिला होता. मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी हा विचार सत्यात उतरवण्यासाठी मा. प्रवीणदादा गायकवाड प्रयत्नशील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” हा मंत्र तरुणांना दिला आहे. जगभरातील उद्योग व्यवसायाच्या संधी साधण्यासाठी तरुणांना आपली मानसिकता बदलावी लागेल, आपले गाव, शहर, राज्य सोडून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी संभाजी ब्रिगेड आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Comment