#BolBhidu #SharadPawar #AjitPawar #NCP
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे सगळे आमदार आहेत, आपण पुढच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावरच लढणार असं सांगितलं. राष्ट्रवादीचे ४० आमदार अजित पवारांसोबत आहेत असं माध्यमांकडून सांगण्यात आलं.
मग प्रश्न उपस्थित झाला की शरद पवारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे का ? तेवढ्यात शरद पवार माध्यमांसमोर आले, पक्षाच्या काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचं सांगितलं, उद्यापासून बाहेर पडणार असून सुरुवात कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन करणार असल्याचंही स्पष्ट केलं.
पण अजित पवारांसह ४० आमदार, २ खासदार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असे नेते भाजपसोबत गेले, त्यामुळं मोजक्या नेत्यांसोबत शरद पवार इथनं पुढचं राजकारण कसं करणार हा प्रश्न चर्चेत आहे. पण शरद पवारांवर असा प्रसंग पहिल्यांदा आलेला नाही, शरद पवार पाचाचे पन्नास करतात हा इतिहास आहे... इतिहासातला हाच दाखला या व्हिडीओतून पाहुयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/