#BolBhidu #SharadPawar #AjitPawar
पवार विरुद्ध पवार, काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार म्हणून बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा झाली, यानंतर पुढच्या काही तासातच अजित पवारांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली आणि पवार विरुद्ध पवार या संघर्षावर अधिकृतरित्या शिक्कामोर्बत झालं. माध्यमांनी देखील पवार विरोधात पवार अशी ही पहिलीच लढाई म्हणून या लढतीचा उल्लेख करण्यास सुरवात केली. रोहित पवारांनी भाजपने पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणला असा आरोप केला. गेल्या काही दिवसात बारामतीच्या निवडणूकीचं चित्र एका बाजूला अजित पवार आणि त्यांच कुटूंब तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटूंब अस झालं आहे, साहजिक पवार कुटूंबातून बाहेर पडून अजित पवारांनीच बंडखोरी केली अशी टिका अजित पवारांवर करण्यात येतेय.
पण पवार विरुद्ध पवार ही इतिहासातील पहिलीच लढाई आहे का? तर नाही…पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीत बरोबर 64 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हा शरद पवारांनी कुटूंबाच्या विरोधात जावून ही लढाई लढली होती. कुटूंबाच्या विरोधात जावून आपल्या सख्या भावाचा पराभव करून शरद पवारांचा राजकीय उदय झाला होता. आज अजित पवार ज्या भूमिकेत आहेत त्याच भूमिकेत इतिहासात शरद पवार होते. काय होती ही लढाई, आजची पवार Vs पवार ही लढाई व त्यावेळीची पवार Vs पवार ही लढाई यात काय साम्य आहे पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/