#BolBhidu #ChandrababuNaidu #JaganMohanReddy
तारीख १९ नोव्हेंबर २०२१, आंध्र प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीवरही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्यावेळी नायडू सभागृहातून बाहेर पडले. पण त्याआधी त्यांनी ढसाढसा रडत एक शपथ घेतली, सत्तेत परत येईपर्यंत सभागृहात पाऊल न ठेवण्याची. कट टू, २२ जून २०२४. गुंटूर इथल्या ताडेपल्ली इथे बांधण्यात येणा-या जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष कार्यालयावर आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून कारवाई करण्यात आली.
आता या दोन घटनांमध्ये दोन व्यक्ती कॉमन आहेत आणि त्यांचं पदही. २०२१ मध्ये चंद्राबाबूंवर टीका झाली जगनमोहन रेड्डी हे आंध्रचे मुख्यमंत्री होते आणि आज त्याच रेड्डींच्या कार्यालयावर बुलडोझर चालला तेव्हा आंध्रचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू. या दोघांमध्ये नेमका संघर्ष काय आहे ? एकहाती सत्ता मिळवणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांचा पराभव होण्याची कारणं काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/