सुधीर फडके (उपाख्य बाबुजी) हे मराठी भावसंगीतातील एक सर्वाेच्च शिखर.
त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी त्यांची परंपरा पुढे चालवीत श्रवणीय रचनांची बरसात संगीत रसिकांवर केली.
या दाेघांच्याही गाण्यांचा स्वरानुभव एकाच मैफलीत घेता यावा, गाण्यांच्या अनुषंगाने गप्पागाेष्टी रंगाव्यात अशा हेतूने मी (दत्ता जाेशी) श्रीधरजींना विनंती केली. `बाबुजी आणि मी` या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. पाठपुरावा केला. बरेच आढेवेढे घेत त्यांनी `बाबुजी आणि मी` या टायटलला मान्यता दिली आणि औरंगाबादेत संत एकनाथ रंगमंदिरात रविवार, दि. 3 मे 2009 ही मैफल रंगली.
या मैफलीचे अत्यंत श्रवणीय सूत्रसंचालन ही वेगळी खासियत आहे. ठाण्यातील ज्येष्ठ संस्कृत प्राध्यापिका, विदुषि साै. धनश्री लेले यांनी हा संवाद माेठ्या ताकदीने पेलला आहे. लालित्यपूर्ण भाषेत, सहज ओघवत्या भाषेत त्यांनी श्रीधरजींशी संवाद साधला, किश्श्यांची पखरण केली, श्रीधरजींना बाेलतेही केले आणि गाण्याचे पदरही उलगडले.
एक नितांतसुंदर मैफिल जन्माला घालण्यास मी कारण ठरलाे, याचा मला आनंद आहे.