सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची इतिहास कालीन विहिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमूना पहायला मिळतो. विहरीत प्रशस्त महाल देखील असुन. इस १७१९ साली बांधलेल्या या विहिरीचे पाणी कितीही दुष्काळ पडला तरी कमी होत नाही ही बारा मोटेची विहीर पाहण्यास देशभरातून पर्यटक गर्दी करत आहेत.
शिवकालीन स्थापत्य शास्त्राचं एक अदभुत उदाहरण म्हणजे ही शेरी निंब गावची बारा मोटेची विहीर, या विहिरीकडे पाहिल्यावर ही विहीर आहे की भुयारी राजवाडा? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
या विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी, साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
#BaraMotachiVihir#Limb