#BolBhidu #NitinDesai #ndstudio
लगान, जोधा अकबर, बाजीराव-मस्तानी हे सिनेमे आणि राजा शिवछत्रपती ही मालिका यामध्ये एक कॉमन धागा आहे तो म्हणजे यांचे भव्यदिव्य सेट्स. हे सगळे भव्यदिव्य सेट्स एकाच माणसाच्या व्हिजनमधून तयार झाले, तो माणूस म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक, निर्माते नितीन देसाईंनी आपल्या कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये स्वतःचं आयुष्य संपवण्याचं पाऊल उचललं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांचं दुर्दैवी निधन झालं. मुंबईतल्या चाळीत गेलेलं बालपण आणि त्यानंतर छोटेखानी कलर लॅबमधून थेट चित्रपट विश्वावर अधिराज्य गाजवण्याचं काम नितीन देसाईंनी केलं.
बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांसाठी त्यानं सेट्स उभारलेच, पण सोबतच हॉलिवूडच्या सिनेमांसाठीही काम केलं. त्यांनी राजकीय कार्यक्रमांसाठी उभारलेले सेट्स कार्यक्रमाची शोभा वाढवायचेच, पण सोबतच गणेशोत्सवात त्यांनी उभारलेले देखावे बघायला गर्दीही व्हायची. नितीन देसाईंचा जीवनप्रवास जाणून घेऊयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/