"सुंदर आपलं मुणगे गाव "
सदर व्हिडिओ हा देवगड तालुक्यातील मुणगे या गावचा आहे. या गावातील जागृत देवस्थान श्री देवी भगवती मंदिर याची माहिती दिली आहे. तसेच येथील समुद्राची हि माहिती आम्ही आपल्याला या व्हिडिओ दिली आहे. मुणगे गाव हे देवगड डेपोतून जवळपास १५-२० किलोमीटर आहे. देवगड डेपोतून हि येथे यायला बसेस आहेत. मुणगे गावाचा इतिहास पाहायला गेलो तर "मुनी" या प्राचीन नावापासून मुणगे हे नाव या गावाला पडले. जानेवारी या महिन्यात येथे खूप मोठी जत्रा भरते. जवळपास ५ दिवस हि जत्रा चालते.
मुणगे गाव हे १२ वाड्यानी नटलेले व सजलेले आहे. येथील समुद्र तर खूप मस्त आहे. संध्याकाळीच्या वेळेला येथील सूर्यास्त तर भारीच दिसतो. आम्ही सर्वानी येथे खूप मज्जा केली.
तुम्हीही मुणगे गावाला भेट द्या आणि येथील निसर्गाचा आस्वाद घ्या. तुम्हाला हि मुणगे गाव खूप आवडेल..........