Google Map Location - Bhairoba Durg
https://maps.app.goo.gl/V2RbERErhjVVJ5nM7
कोतूळ - शिळवंडी - कोहणे - तळे - कोथळे
(27 किमी)
राजूर - हिलेदेव घाट - माणिकओझर - वांजुळशेत - खडकी - वाघदरी - कोथळे
(23 किमी)
सर्वसाधारणपणे ज्या डोंगरावर, गडावर बहिरोबाचे(भैरोबाचे) देवस्थान असते त्या डोंगराला/गडाला भैरवगड म्हटले जाते. (काही ठिकाणी भैरी मातेचे देवस्थान असल्याचे देखील पहावयास मिळते) तसे पाहिले गेलेे तर आदिवासी भागांत बऱ्याच डोंगरांवर बहिरोबा देवस्थान आहेत. परंतू आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच भैरवगड अधिकृत मानले जातात.
१) मोरोशीचा भैरवगड (ठाणे जिल्हा)
२) नरडव्याचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
३) सातारा जिल्ह्यातील भैरवगड
४) कोथळे भैरवगड (अहमदनगर जिल्हा)
५) शिरपुंजे भैरवगड (अहमदनगर जिल्हा)
*पायथ्याला पोहचण्याचा मार्ग*
या भैरवगडांपैकी दोन नगर जिल्ह्याच्या अकोले तालूक्यातील. एक कोथळे या गावचा तर एक शिरपुंजे या गावचा. कोथळे म्हणजे राजूर या गावापासून साधारण २३-२४ किमी.
राजूर - हिलेदेव घाट - माणिकओझर - वांजुळशेत - खडकी - वाघदरी - कोथळे
(23 किमी)
या मार्गे राजूरहून आपण या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावात म्हणजेच कोथळे गावात पोहचतो. तसेच पुणे मार्गे आल्यास कोतूळ गावातून
कोतूळ - शिळवंडी - कोहणे - तळे - कोथळे
(27 किमी)
या मार्गे जाऊ शकतो.
*बहिरोबाची वाट*
साधारण आश्विन महिन्यात एखाद्या रविवारी *बहिरोबाची वाट* असते. *बहिरोबाची वाट* म्हणजेच बहिरोबाची यात्रा. आदिवासींची दैवते ही निसर्गातील घटकांची अथवा व्यक्तींची प्रतीके असतात. त्यातीलच बहिरोबा हे एक दैवत. पण निसर्गातल्या नक्की कोणत्या घटकाचे प्रतिक आहे हे नक्की समजू शकले नाही. काही व्यक्तीकडून असे समजले की बहिरोबा म्हणजे ऐकू न येणारा. म्हणजेच. साप. (परंतू हे कितपत खरे आहे हे मलाही सांगता येणार नाही.)
आपण शेतात जे पिकवतो ते अगोदर निसर्गाला अर्पण करण्याची प्रथा आदिवासींमध्ये आहे. पुर्वी जुनमध्ये पहिला पाऊस पडला की डोंगरावर जाण्याचा रस्ता अवघड व्हायचा. खराब रस्ता, जंगल, झुडपे, जंगली प्राण्यांची भिती अशा कारणांमुळे पावसाळ्यात डोंगरावर जाणे पुर्णपणे बंद असायचे. पावसाळ्यात झाडे-झुडपे वाढून रस्त्यात खुप अडचण व्हायची. पावसाळा संपल्यानंतर मग आसपासची लोकं ठरवून एखाद्या रविवारी जमायची व रस्त्यातील अडचण दुर करून येण्याजाण्याची वाट तयार करायचे. हा एक उत्सवच असायचा. तिच *बहिरोबाची वाट*
गावात प्रत्येकाच्या घरी नविन तांदळाची खिर केली जाते. या खिरीचा निवद(नैवेद्य) बहिरोबाला अर्पण केला जातो. त्यानंतरच नविन तांदूळ खायला सुरुवात केली जाते. अशा प्रकारे नविन तांदळांचा *निवद* बहिरोबाला अर्पण करून हा उत्सव सर्व गावकरी एकत्र येऊन साजरा करतात.
*कोथळे भैरवगड*
*हा डेंगरही बराच उंच असल्याणे याच्यावरून खाली दिसणारे दृष्य डोळ्यात साठविण्यासारखे असते. पुर्वेला कोथळे गाव व गावाशेजारचे कोथळे धरण, थेडे दक्षिणेकडे कुंजरगड त्याखाली गाढवाचा डोंगर. पश्चिमेला तोलरखिंड मार्ग, हरिश्चंद्र गडाचे तारामती शिखर व बाले किल्ला. उत्तरेला कोथळी सुळका किंवा कोथळीचा डोंगर. हा जो कोथळीचा सुळका आहे याचा आकार *कोथळी* सारखा आहे. *कोथळी* म्हणजे आदिवासींचे धान्य साठविण्याचे पारंपारीक मातीचे साधन. त्यामुळे या सुळक्याला कोथळी सुळका म्हणतात. यावरूनच या गावाला देखील कोथळे असे नाव पडलेले आहे. उत्तरेलाच थोडे दुरवर शिरपुंजे भैरवगड दिसतो. असे चहूबाजूंनी सह्याद्रीचे अचंबित करणारे सौंदर्य दाखविणारा कोथळे भैरवगड आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो.
गावातून उत्तरेला घनदाट देवराईतून मर्ग काढत गडाकडे जावे लागते. महाराष्ट्रात खुप साऱ्या देवराई आहेत. त्यापैकीच ही भैरोबाची देवराई. देवराई म्हणजे देवाच्या/देवीच्या नावाने संरक्षित केलेले रान/राई (जंगल). देवराईमध्ये कुणीही झाडे तोडत नाही अथवा प्राणी मारत नाहीत. देवराई म्हणजे जंगल वाचविण्यासाठी निर्माण केलेली एक संस्कृतीच म्हणावी लागेल. गड फारसा उंच नाही. तरीही गडावर पोहचायला साधारण एक तास लागतो. गडावर जातानाच दोन पाण्याचे टाके लागतात. त्यातील एका टाक्यातील पाणी बर्षभर पिण्यायोग्य असते. अवघड ठिकाणी वनविभागाने लोखंडा पायऱ्या बसवल्यानेे चढाई सुलभ होते. अशा तीन लोखंडी पायऱ्या आहेत. गडमाथ्यावर पोहचताच पश्चिमेला हरिश्चंद्रगड दिसू लागतो. गडावर विस्तीर्ण पठार आहे. उत्तरेचा भैरोबा देवस्थान एका उंबराच्या झाडाखाली वसलेले आहे. गडावर हे एकच सावलीसाठी झाड आहे. त्यामुळे शक्यतो सर्वजन लवकरच गडावर येऊन दर्शन घेऊन जातात.
*अशी ही बहिरोबाची वाट*