#BolBhidu #UddhavThackeray #BJP
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि २०२३ मध्ये अजित पवारांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्यानंतर आता भाजपची नजर उद्धव ठाकरेंच्या खासदारांवर असल्याची चर्चा आहे. लोकसभेत ठाकरेंचे ९ खासदार आहेत. त्यापैकी ६ खासदार भाजपच्या गळाला लागले असल्याचीही बातमी आहे. या सहा खासदारांमध्ये पाच खासदार ग्रामीण भागातील तर एक खासदार मुंबईतील असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येतायंत.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरेंना धक्का देण्याची चर्चा असतानाच आता भाजपही ठाकरेंसाठी ट्रॅप लावत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळं भाजप एकाच दगडात दोन पक्षी तर मारत नाही ना, अशाही चर्चा होतायंत. या चर्चांमागची नेमकी कारणं काय, भाजपनं ठाकरेंचे खासदार गळाला लावण्यासाठी कशी रणनीती आखलीय आणि भाजप-शिंदेंमुळं ठाकरे कसे ट्रॅप व्हायला लागलेत, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/