How To Make Bombil Fry | Bombil Recipe In Marathi | Crispy Bombil Fry | कुरकुरीत बोंबील फ्राय
साहित्य - ५/६ ताजे साफ केलेले बोंबील, १ tsp हळद, २ tblsp घरगुती लाल मसाला, २ tblsp लिंबाचा रस, ३ tblsp हिरवं वाटण ( ½" आले, ५/६ लसूण पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर. ) तळण्यासाठी तेल, ½ वाटी रवा, ३/४ tblsp तांदळाचे पीठ, घरात असलेला पाटा किंवा ८/९ किलोची कोणतीही वस्तू आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम बोंबील घरी किंवा कोळिणींकडून मधून चिरून घ्यावे. आता एका कपड्यावर बोंबील दोन भाग खोलून आतील बाजू उपडी करून ठेवावे. आता त्यावर कपड्याचा दुसरा भाग ठेवावा. आता वजनदार पाटा त्यावर ठेवून किमान २ तास वाट पाहावी. २ तासानंतर बोंबील मधले आतील पाणी निघून बोंबील चपटे आकारात झालेले दिसतील. आता त्यावर मीठ, लिंबाचा रस, हळद, घरचा लाल मसाला, हिरवं वाटण घालून सर्व साहित्य छान बोंबलांना चोळून घ्यावे. आता रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून बोंबील त्यात दोन्ही बाजूने घोळून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून बोंबील दोन्ही बाजूने ४/४ मिनिटे मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्यावे. बोंबील तळून झाल्यावर गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.
Traditional Homemade Masala 👉 https://youtu.be/5v2dGKKHXAM
#BombilFry #IndianSeafoodRecipe #BombilRecipe
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/
Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com