MENU

Fun & Interesting

#bts काश्मीर मध्ये फुलणार एजे लीलाच प्रेमाचं नातं! #zeemarathi #navrimilehitlerla #viralvideo #love

Filmy Gappa 5,607 lượt xem 4 days ago
Video Not Working? Fix It Now

एजे लीलासाठी हटके प्रपोज करणार!
काश्मीर मध्ये फुलणार एजे लीलाच प्रेमाचं नातं!
गुलमर्ग मध्ये बर्फात साडी नेसून शूट करणं माझ्यासाठी टास्क होता - वल्लरी विराज

एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याच तो ठरवतो. लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज हवंय जसं जिमी शेरगील रिषितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसं. लीलाच म्हणणं आहे की जसं आपलं नातं युनिक आहे तसं प्रपोजलही युनिकच हवं. प्रेमात असंच असत इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात. तिची दुसरी इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं जिथे छान बर्फ असेल आणि बर्फाच्या मध्ये उभं राहून रोमँटिक डान्स करायचाय आणि तिला एक मस्त शिकारा राईडही करायची आहे. ह्या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे. कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडलाय.

या सगळ्या शूट बाबत *‘वल्लरी विराजने’* आपला अनुभव व्यक्त केला. *आम्ही काश्मीरला गेलो होतो तिथे आम्ही ४ दिवस शूट केलं.* आम्ही निसर्गमय बर्फाच्या चादर ओढलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले जसं गुलमर्ग आणि श्रीनगर. तिकडे शूटिंग करण इतकं सोपं न्हवत कारण प्रचंड थंडी होती. पण बर्फात शूट करायची मज्जा काही वेगळीच होती. आम्ही गुलमर्गला बर्फात एजे-लीलाचा प्रोपोजल सीन शूट केला. गुलमर्ग मध्ये बर्फात साडी नेसून एक गाणं ही शूट केलं गेलं, जो माझ्यासाठी एक मोठा टास्क होता. मला साडीत खुप थंडी वाजत होती. मी पूर्ण वेळ कुडकुडत होते. जसा सीन कट होत होता मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होत. खासकरून 'नवरी मिळे हिटलरला' ची जी क्रिएटिव्ह आहे मनाली तिनी माझी अतिशय काळजी घेतली. एजे म्हणजेच राकेश बापट ने ही मला खूप सपोर्ट केलं. पण जेव्हा मी ते स्क्रीनवर पाहिलं माझी उत्सुकता तेवढीच वाढत गेली. आम्ही दललेकला शिकारा मध्ये बसूनही शूट केलं तो ही एक छान अनुभव होता. हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहील."

तेव्हा पाहायला विसरू नका हे ग्रँड प्रपोजल 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. #zeemarathi #zeemarathiserials #zeemarathiofficial #navrimilehitlerla #raqeshbapat #vallariviraj #kashmir #love @zeemarathi

Comment