MENU

Fun & Interesting

परदेशी राजदूतांनी, अस्सल चित्रांनी Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या दिसण्याचं वर्णन कसं केलंय ?

BolBhidu 309,508 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #AkshayKumar आमच्या कट्ट्यावर त्यादिवशी विषय होता पिक्चर आणि छत्रपती शिवाजी महाराज हा. त्याचं झालं असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला अक्षय कुमारचा व्हिडीओ व्हायरल झाला. एकाच्या दृष्टीनं हे परफेक्ट कास्टिंग होतं. दुसऱ्याचं म्हणणं होतं, अक्षय कुमारला जमलं नाही रे, चंद्रकांत मांढरेच बेस्ट. तिसरा म्हणला, शरद केळकर एकदम डिट्टो दिसतो, त्याला घ्यायला पाहिजे होतं. कुणाला अमोल कोल्हे परफेक्ट वाटले, तर कुणाला शंतनू मोघे. आजवर बऱ्याच अभिनेत्यांनी छत्रपती शिवरायांच्या भूमिका साकारल्या, नाटक, सिनेमा, सिरीयल अशी माध्यमंही वेगळी होती. पण दुर्दैवानं यापैकी बऱ्याच अभिनेत्यांना शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेच्या जवळपासही पोहोचता आलेलं नाही. कुणाला जमलं कुणाला नाही, याच्या चर्चा होत राहतील पण प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत होते? त्यांच्या रूपाची, शरीरयष्टीची, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाची वर्णनं आज उपलब्ध आहेत का ? छत्रपतींचं तेजस्वी रूप नेमकं होतं तरी कसं ? हे आजच्या घडीला आपल्या प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM → Twitter: https://twitter.com/bolbhidu → Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/ ​→ Website: https://bolbhidu.com/

Comment