MENU

Fun & Interesting

बहिणीने बनवला चिकन सुक्का 😍 | रविवारचा बेत Chicken Sukka - Panvel ( Navi Mumbai)

S FOR SATISH 362,877 4 years ago
Video Not Working? Fix It Now

बहिणीने बनवला चिकन सुक्का 😍 | रविवारचा बेत Chicken Sukka - Panvel ( Navi Mumbai) माझी छोटी बहीण पूजा आमच्या पनवेलच्या घरी राहायला आली आहे. तिचा छोटा बाळ त्याचं नाव अद्विक त्याला आम्ही लाडाने अदु बोलतो. बहीण घरी आल्यावर तिच्या हातच्या नवनवी रेसिपी पदार्थ चाखण्याची आम्हाला संधी असते. माझी आईसुद्धा गावावरून मुंबईला आली आहे. आम्ही सर्वजण मिळून जेवण करत असतो. गावी रविवार सोमवार सारखाच पण मुंबईमध्ये रविवार हा सणासारखा असतो. रविवारी सगळ्यांना सुट्टी असते. रविवारी आपण खास मासे, चिकन किंवा मटण घरी बनवत असतो. आम्ही आमच्या घरी असाच रविवारचा बेत आखला. बहीण घरी आली आहे तर चिकन आणला होता. बहीण चिकन सुक्का खूप छान बनवते. आम्ही चिकन सुक्का आणि रस्सा दोन्ही बनवण्याचे ठरवले. चिकन सुक्का बनवणे अतिशय सोपे आहे. घरगुती पद्धतीने चिकन सुक्का आम्ही कसे बनवतो हे बहिणीने दाखवले आहे. खास गोडामसाला वापरून चिकन सुक्का बनवला जातो. गावरान चव या चिकन सुक्क्याला असते. कोकणात चुलीवरील चिकन सुक्का आणि रस्सा खूप लोकप्रिय आहे. आईने आम्हाला जेवण बनवायला शिकवलं आहे. #ChickenSukka #ChickenSukkaRecipe #PanvelNaviMumbai #sforsatish आम्ही पनवेलमध्ये राहतो, आम्हाला बाजार जवळ आहे. प्रांजूला सोबत घेऊन बाजारातून आम्ही चिकन आणला होता. आईने चिकन रस्सा तिच्या पद्धतीने घातला. चिकन रस्सा घालताना ती खास बटाटा उकळून घेते. चिकन सुक्का आणि रस्सा तयार करताना गोडामसाला असेल तर चव लाजवाब येते. घरगुती मसाले वापरून आई आणि बहिणीने चिकन सुक्का बनवला. रविवारच्या दिवशी आमच्या घरी असा बेत असतो. आम्ही प्रदनुला आणि बायकोला खूप मिस करतोय. प्रदनु मुंबईला असता तर खूप धमाल केली असती. सद्या अदु आहे त्यामुळे आमचा विरंगुळा होतो. आई, अदु, प्रांजु, आई आणि बहीण यांच्यासोबत घरी दिवस एकदम मजेत जातो. प्रांजूला चिकन तव्यावर फ्राय केलेलं खूप आवडतं. प्रांजुसाठी आम्हाला चिकन फ्राय करावा लागतो. आम्ही दुपारी जेवायला सगळे पंगतीने बसलो. बहिणीने बनवलेल्या चिकन सुक्का आणि आईने बनवलेला चिकन रस्सा अतिशय चवदार, लाजवाब झाला होता. तुम्ही सुद्धा असे चिकन सुक्का बनवा आणि आम्हाला कसं होतं ते जरूर कळवा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही बहिणीने बनवलेलं चिकन सुक्का आणि आमच्या घरचा रविवारचा बेत दाखवला आहे तुम्हाला व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा ! https://www.facebook.com/koknatlamumbaikar https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Comment