नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत शिंपल्यांचे सुक्क
साहित्य: चिरलेला कांदा टोमॅटो, कोथिंबीर मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, काजूची पेस्ट, हळद, घरगुती मसाला, कोथिंबीर, खोबरं आणि मीठ
कृती:
१) शिंपले व्यवस्थित कापून व स्वच्छ करून घ्या
२) एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे
३) त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट हळदी व कोथिंबीर मिरचीची पेस्ट घालून व्यवस्थित ढवळून घ्या
४) आता त्यामध्ये शिंपले टाका व व्यवस्थित परतवून घ्या
५) आता त्यामध्ये आपला घरगुती मसाला, गरम मसाला थोडंसं पाणी घाला
६) त्यानंतर काजूची पेस्ट व खोबरे घाला आणि दहा मिनिटं शिजवून घ्या
७) आता कोथिंबीर घाला व त्याची चांगली सजावट करा
तर अशा प्रकारे तयार आहे आपलं शिंपल्यांचे सुक्क
सर्वांनी ही रेसिपी नक्की करून बघा व व्हिडिओ कशी झाली आहे ते कमेंट करायला विसरू नका
video credit:
music: @YouTube @PravinKoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇