Come Explore The Ancient And Unique Experience Of Naneghat | An Experience In Experiential Tourism
साधारणपणे पावसाची रिपरिप सुरु झाली की, रानभाज्या बाजारात डोकावू लागतात या भाज्यांच्या चविची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले लोक त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्या जातात. पावसाळयात जंगलात, डोंगराळ भागामध्ये व शेतशिवारात या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदीवासी महिला व ईतर शेतकरी बाजारात त्या विक्रीसाठी घेवून येतात. रानभाज्याबदल पुरेशी माहिती नसल्यामुळे ईच्छा असूनही अनेकाकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेतांना शक्यतो स्थानिक आदिवासीकडून त्या घ्याव्यात त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना या भाज्याविषयी जास्त अचुक माहिती असते. ज्या भाज्यामध्ये पानाचा समावेश अधिक आहे या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकडून ते पाणी टाकुन द्यावे त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यामधील अंगभुत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पध्दतीने वाढलेल्या असतात त्यामुळे यात खते किंवा किटकनाशके वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही उकडून केलेल्या भाज्यामध्ये शक्येतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.
7020092221