#BolBhidu #DarshanPavithraGowda #RenukaSwamyMarder
जिगरथंडा डबल एक्स नावाचा एक तमिळ पिक्चर आहे, फुल खुंखार, हाणामारी, गुंडगिरी आणि शेवटी डोळ्यात पाणी. पण त्याची सुरुवात होते, फॅन क्लबच्या राड्यांमधून. हे फॅन क्लब असतात अॅक्टर लोकांचे, या हिरोच्या फॅन क्लबचा अध्यक्ष त्या हिरोच्या पिक्चरला किंमत देत नाही आणि तिथून पुढं सुपारी-बिपारी लय राडा होतो. आपण तीन तास मजा करतोय आणि होत असल पिक्चरमध्ये म्हणून विषय सोडून देतोय. कारण कुठं एखादा फॅन त्याच्या आवडत्या ऍक्टरसाठी फॅन क्लब काढणार, कुठं एवढा एकनिष्ठ राहणार आणि त्याच्यावरुन भांडण करायला तो काय राजकीय नेता आहे होय... पण या सगळ्या गोष्टी फक्त पिक्चर पुरत्या नाहीत, तर प्रत्यक्षातही घडल्या आहेत, असं सांगितलं तर ? तर विश्वास ठेवावा लागतोय.
कारण आवडत्या अॅक्टरच्या सांगण्यावरुन त्याच्या फॅन लोकांनी एक खून केला, बरं ज्याचा खून केला तोही याच अॅक्टरचा फॅन. पण खुनाची स्टोरी जशी सिम्पलमध्ये सुटत नाही, तशीच या प्रकरणातले आरोपी सापडण्याचीही. सगळ्या सोशल मीडियावर आणि कर्नाटकात दर्शन केस म्हणून फेमस झालेलं हे कांड आहे काय ? ते उलगडलं कसं ? ऑन स्क्रीन हिरोमधला ऑफ स्क्रीन व्हिलन दाखवणारी ही स्टोरी..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/