#BolBhidu #DelhiAssemblyResultLive #DelhiElectionResult
दुपारी १२ पर्यंत हाती आलेल्या दिल्ली विधानसभेच्या कलांनुसार दिल्लीतल्या ७० पैकी तब्बल ४६ जागांवर भाजपनं आघाडी घेतली असून, सत्तास्थापनेच्या दिशेनं वाटचाल केल्याचं पहायला मिळतंय. तर गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवालांना मात्र मोठा सेटबॅक बसल्याचं पहायला मिळतंय. दिल्लीत आपला आतापर्यंत फक्त २४ जागांवर आघाडी मिळालीय. त्यामुळं दिल्लीत भाजपची सत्ता येणार हे आता निश्चित मानलं जातंय.
दिल्लीतल्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये फक्त एक आकडी जागा जिंकणारी भाजप यावेळी थेट स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं जात असल्यानं भाजपच्या या यशाची चांगलीच चर्चा होतेय. दिल्लीत भाजप तब्बल २७ वर्षांनी सत्ता स्थापन करणार असल्यानं भाजपच्या या ऐतिहासिक विजयाची नक्की कारणं कुठली, भाजपनं दिल्ली सर करत केजरीवालांना धक्का कसा दिला, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/