#BolBhidu #DelhiElectionResult2025 #ParveshVerma
दिल्ली विधानसभेसाठी आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीचा प्रचार सुरु होता. कधी सहानुभूतीच्या जोरावर आप जिंकेल असं बोललं जात होत, तर कधी अँटी इनकंबन्सी असल्यामुळे आपचा पत्ता कट होईल असं बोललं जात होत. पण अखेर दिल्ली निवडणुकांचे निकाल हाती आलेत. आणि भाजपने 45 पेक्षा जास्त जागा जिंकून आपचा पराभव केलाय. आम आदमी पक्षाला या निवडणुकीत ७० जागा लढवून देखील 22 जागाच जिंकता आल्या. या निकालांचे सुरुवातीचे कल हाती येत असताना आपचे काही महत्वाचे मोठे नेते हे पिछाडीवर असल्याचं दिसत होत. त्यातलं एक महत्वाचं नाव होतं, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं.
आपने जर यावर्षीची दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली तर अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं, पण नवी दिल्ली मतदारसंघाचा निकाल समोर आला, आणि सगळ्यांनाच धक्का बसला. कारण संभाव्य मुख्यमंत्री म्हणून बघितल्या जाणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला तोही ४ हजार पेक्षा जास्त मतांनी…खरतर केजरीवालांची हार म्हणजे आपची सपशेल हार. पण या पराभवानंतर एक नाव चर्चेत आलं, ते अरविंद केजरीवाल यांना हरवणार भाजप नेते परवेश वर्मा यांचं. कोण आहेत प्रवेश वर्मा? काय आहे त्यांची ताकद? आणि त्यांनी केजरीवाल यांना कसं हरवलं? पाहुयात या व्हिडीओ मधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/