Delhi New CM 2025: दोन वेळा पराभव, पहिल्यांदाच आमदार, Delhi CM पद मिळालेल्या Rekha Gupta आहेत कोण ?
#BolBhidu #RekhaGupta #DelhiNewCM
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारीला लागला. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपनं ७० पैकी ४८ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळालं. तेव्हापासून भाजप दिल्लीत कोणाला मुख्यमंत्री करणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर निकालाच्या ११ दिवसांनी दिल्लीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपनं दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी मिळालीये. २० फेब्रुवारीला दुपारी साडे बारा वाजता रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश वर्मा हे उपमुख्यमंत्रीपद सांभाळणार आहेत. तर रोहिणीचे आमदार विजेंद्र गुप्ता दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत.
माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार, दिल्लीत महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्ववंसेवक संघाकडून देण्यात आला होता. संघानं रेखा गुप्ता यांचं नाव पुढे केलं, ज्याचा अखेर भाजपनं स्वीकार केल्याचं पहायला मिळतंय. आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत. पण दिग्गजांना डावलून पहिल्यांदाच निवडून आलेल्या रेखा गुप्ता आहेत कोण? भाजपनं दिल्लीत त्यांना मुख्यमंत्रीपद का दिलं? त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीदाच्या शर्यतीत आणखी कोण होतं? या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/