देवकुंड वाटरफॉल रॅपलिंग Devkund Waterfall Rappelling @Trekmaster
Experience The Thrill Of Devkund Waterfall Rappelling With Trekmastervlog! देवकुंड
#devkund
#maharashtra
#devkundwaterfall
#sahyadri
#treking
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड धबधबा आहे. माणगाव तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिरा गाव आहे. याच भिरा गावाजवळ धरण आहे. देवकुंड कार पार्किंगला पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर देवकुंड धबधब्याजवळ पोहचता येते.
देवकुंड धबधबा तरुणाईला खुणावत असतो. हा धबधबा जेथून सुरू होतो तेथून आम्हाला पडणाऱ्या पाण्यासोबत रोपच्या साहाय्याने खाली उतरायचे होते. त्याला रॅपलिंग असे म्हणतात.
पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा पावसाळ्यात अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे.
पुणे शहरातून देवकुंड धबधाब्याला जाण्यासाठी चांदणी चौकातून - पिरंगुट - पौड - माले- मुळशी- चाचवली - वारक - निवे सारोळे - ताम्हिणी घाटातून भिरा गावात पोहचता येते.