#BolBhidu #NamdevMaharajShastri #DhananjayMunde
धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येतंय, तो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? भगवानगड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी उभा आहे.” या विधानामुळे ३० जानेवारीपर्यंत संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या धनंजय मुंडेंबाबत सॉफ्ट कार्नर तयार झाल्याची चर्चा आहे. या विधानामुळे धनंजय मुंडेंची त्यांच्यापासून दूर चाललेली पॉवर त्यांना परत मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आहे, हे सगळं घडवणारं विधान आहे महंत डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांचं.
याच महंत नामदेव शास्त्री महाराजांनी भगवान गडाचे चौथे उत्तराधिकारी ठरवले, पंकजा मुंडेंना भगवान गडावर मेळावा घ्यायला कडाडून विरोध केला आणि राजकीय भूमिकेसाठी भगवान गडाचा वापर नको अशी घोषणाही केली. महंत नामदेव महाराज शास्त्री यांना भगवान गडाचा आवाज असं म्हणलं जातं. साहजिकच त्यांनी आपला धनंजय मुंडेंना पाठिंबा आहे असं वक्तव्य केल्यानं, त्यांनी मुंडेंना एकप्रकारे क्लीनचिट दिल्याचीच चर्चा आहे. पण धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना त्यांना क्लीनचिट देणाऱ्या नामदेव महादेव शास्त्रींचा इतिहास काय आहे ? याआधी त्यांच्या नावाची चर्चा कधी झाली होती ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/