Dhas, Solanke आणि Kshirsagar अडचणीत, Ajay Munde यांची पत्रकार परिषद, Dhananjay Munde ॲक्टिव्ह झालेत?
#BolBhidu #DhananjayMunde #SureshDhas
तारीख- ४ मार्च २०२५... अखेर धनंजय मुंडेंनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा... सगळ्या न्यूज चॅनलवर ही बातमी सारखी फ्लॅश होत होती. संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा या हत्येला कारणीभूत ठरलेलं आवादा कंपनीचं खंडणी प्रकरण. या दोन्ही प्रकरणांत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड दोषी ठरला आणि होय नाही, म्हणता म्हणता मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावाच लागला. यामुळं परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात असलेल्या धनंजय मुंडेंच्या वर्चस्वालाच मोठा सुरूंग लागल्याच्या चर्चा झाल्या. मग धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण मुंडेंनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळं मुंडेंवर आरोप करणारेच गोत्यात येत असल्याचं पहायला मिळतंय.
बीडमध्ये मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देणाऱ्या सुरेश धसांपासून संदीप क्षीरसागर सगळ्यांचीच जुनी प्रकरणं आता समोर यायला लागलीयत. तर मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडेंनी माध्यमांसमोर येत धसांचे आरोप खोडून काढत मुंडे कुटुंब धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं. यामुळं आरोप झाले, मंत्रीपद गेलं तरी धनंजय मुंडे पुन्हा अँक्टीव्ह झालेत का, असं आता बोललं जातंय. असं बोलण्यामागची नेमकी कारणं काय, धनंजय मुंडे खरंच अँक्टिव्ह झालेत का, तेच या व्हिडिओमधून बघुयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/