#BolBhidu #USAIDFund #DonaldTrump
२ दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून भारताला दिला जाणारा २ कोटी डॉलर्सचा निधी थांबवला होता. एलोन मस्क यांच्या DOGE ने हा निर्णय पहिल्यांदा घेतला आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी DOGEच्या निर्णयाचे समर्थन केले. समर्थन करताना ते म्हणाले कि "आम्ही भारताला दोन कोटी डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. ते जगातील सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या देशामध्ये आहेत. त्यांचा व्यापार करही खूप जास्त आहे. मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा आदर करतो, पण मतदानांची टक्केवारी वाढावी म्हणून दोन कोटी डॉलर का द्यायचे?", असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला होता. त्यांनतर थांबतील ते डोनाल्ड ट्रम्प कसले. एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की जो बायडन यांच्या कार्यकाळात भारतात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून, निवडणूक प्रक्रिया मजबूत व्हावी म्हणून दिला गेलेला सुमारे १८२ कोटी रुपयांचा निधी 'कुणी दुसरेच निवडून यावेत' म्हणून दिला जात होता. हा एक गंभीर आरोप त्यांनी केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण, भारतीय राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.
सत्ताधारी भाजपला हा आयता मुद्दा मिळाला आणि त्यांनी काँग्रेसवर विदेशी निधीचा भारतीय निवडणुका प्रभावित करण्यासाठी वापर केल्याचा आरोप केला आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपात यूएसएआयडीच्या माजी भारतीय संचालिका वीणा रेड्डी याही चर्चेमध्ये आल्या आहेत. तसेच इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार ज्या फंड विषयी ट्रम्प बोलत आहेत तो भारताला नाही तर बांगलादेशला दिला गेलेला आहे. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊ. तसेच नेमके आरोप काय? आरोपांवर उत्तर काय? आरोपात तथ्य किती? वीणा रेड्डी कोण आहेत? या प्रशांची उत्तरे जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/