करवीर राज्य संस्थापिका, स्वराज्य रक्षिका, मोगलमर्दिनी...महाराणी ताराबाई. मराठ्यांच्या उत्तरेतल्या साम्राज्यविस्ताराची प्रणेती असा जिचा उल्लेख इतिहासकार करतात ती ताराराणी मराठ्यांच्या इतिहासात मात्र दुर्लक्षितच राहिली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठी गादीचा जो वाद झाला त्यात ताराराणी पेशव्यांशीही लढली...पण कायम छत्रपती गादीचा हक्क, सन्मान कायम राहावा यासाठी आग्रही राहिली. स्त्री म्हणून सामाजिक, वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेशीही तिचा लढा झाला. याच महाराणी ताराबाईबद्दल इतिहास संशोधक आणि प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी एक चरित्रग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यानिमित्ताने या विलक्षण व्यक्तिमत्वाबद्दलची ही खास मुलाखत.
#tararani #tarabai #marathahistory #prshantkadamchannel #marathasamrajya #marathas #historyfacts #historyuncovered